Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

86th Aundh Music Festival: औंधमध्ये शुक्रवारी रंगणार सुरांची मैफल! दिग्गज कलाकारांच्या स्वरांनी सजणार ८६ वा संगीत महोत्सव

86th Aundh Music Festival: शास्त्रीय संगीतप्रेमींच्या प्रतीक्षेत असलेला ८६ वा औंध संगीत महोत्सव शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे आयोजित या महोत्सवात पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर यांच्यासह अनेक दिग्गज आणि युवा कलाकार गायन, वादन व कथ्थक नृत्य सादर करणार आहेत

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 26, 2026 | 05:37 PM
86th Aundh Music Festival: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

86th Aundh Music Festival: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ३० ऑक्टोबरला ८६ वा औंध संगीत महोत्सव
  • पं. उल्हास कशाळकर आणि पं. सुरेश तळवलकर यांची विशेष उपस्थिती
  • गायन, वादन आणि कथ्थक नृत्याची तीन सत्रांत मेजवानी

रसिकांना आतुरता लागलेला 86 वा औंध संगीत महोत्सव शुक्रवारी 30ऑक्टोबर रोजी होणार आहे. पद्मश्री पं.उल्हास कशाळकर ,पं.सुरेश तळवलकर यांच्या सह दिग्गज कलाकारांच्या गायन,वादनाची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. अशी माहिती शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या विश्वस्त श्रीमती अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी दिली. 86th Aundh Music Festival:

संगीत महोत्सवाची सुरुवात

दरवर्षी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे ‘ औंध संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेली 85वर्षे ग्रामीण भागातील अव्याहतपणे हा महोत्सव सुरू आहे.हा महोत्सव भारतातील महत्वाच्या महोत्सवांपैकी एक असून या संगीत महोत्सवाची सुरुवात १९४० साली औंध संस्थानचे दरबारी गायक पं.अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा व त्यांचे चिरंजीव व्हायोलिन वादक पं. गजानन बुवा जोशी या पितापुत्रांनी केली. पुढे महोत्सवाचे स्वरूप वाढत गेले आणि १९८१ साली पं. गजानन बुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ‘ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

संगीत महोत्सवात पं.जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, श्रीमती रोहिणी भाटे, गिरिजादेवी, पंडित के.जी. गिंडे, सुलतान खाँसाहेब, पं. मधुकर जोशी, पद्मश्री पं.उल्हास कशाळकर, पद्मश्री पं.सुरेश तळवलकर, यशवंत बुवा जोशी, अश्विनी भिडे-देशपांडे, योगेश समसी, पं.वेंकटेश कुमार, निलाद्रीकुमार,शुभा मुद्गल अशा अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांनी हजेरी लावली आहे.

या महोत्सवास लाभला

औंधच्या कलाप्रेमी राजघराण्याचा आशीर्वाद देखील पहिल्यापासूनच या महोत्सवास लाभला आहे.जोशी कुटुंबातील नवीन पिढीने महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी खांद्यावर घेऊन शास्त्रीय संगीताचा अभिजात वारसा जपण्याचा प्रयत्न पल्लवी जोशी आणि अपूर्वा गोखले यांचा आहे.वादन व नृत्य या संगीताच्या तिन्ही प्रकारांचे सादरीकरण या महोत्सवात होते. अनेक युवा कलाकारांना या महोत्सवात आपली कला सादर करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

Aai Tuljabhavani Marathi Serial: छोटी तुळजाई साकारणाऱ्या सांची भोयरची कमाल! VFX आणि ॲक्शन सीन्सबद्दल केला मोठा खुलासा

महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार

सदर महोत्सव तीन सत्रांमध्ये सादर होईल. सकाळी ९ वाजता किर्लोस्कर ग्रुप कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रविंद्र सामंत, यांच्या हस्ते , तसेच प्रशासक व ग्रामविकास अधिकारी चाॅदशा काझी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष पं. अरुण कशाळकर यांचा ‘ संगीत नाटक अकादमी पुरस्कार ‘ मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुणे रवींद्र सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.
प्रथम सत्राची सुरुवात युवा गायिका प्रिया पुरूषोत्तमन यांच्या गायनाने होईल.

ज्येष्ठ संवादिनीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे संवादिनीवादन सादर होईल. पं. गजाननबुवा जोशी यांच्या नाती व सुप्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे सहगायन सादर करणार आहेत. प्रथम सत्राची सांगता ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबला संगत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर करणार आहेत.

गायनाचा आनंद श्रोत्यांना घेता येईल

दुपारी 3.15 वाजता द्वितीय सत्राची सुरुवात युवागायक अनिरुद्ध ऐताळ यांच्या गायनाने होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक अनीश प्रधान यांचे एकल तबलावादन सादर होईल. यानंतर ज्येष्ठ गायक पं. अरुण कशाळकर यांच्या गायनाचा आनंद श्रोत्यांना घेता येईल. यानंतर औंध संगीत महोत्सवानिमित्त प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘ रियाझ ‘ या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवर अतिथी आणि प्रशासक , ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत औंध यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा

त्यानंतर पं. विकास कशाळकर यांचा पंच्याहत्तरी निमित्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात येईल.रात्री १० वाजता अखेरच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात निखिल परिहार यांच्या कथ्थक नृत्याने होईल. सुप्रसिद्ध बासरीवादक प्रविण गोटखिंडी यांचे बासरीवादन सादर होईल. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य कृष्णा साळुंके यांचे पखवाज वादन सादर होईल. किराणा घराण्याचे गायक अंबरीश दास यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल.

महोत्सवाचा लाभ

संपूर्ण महोत्सवात सुमित नाईक , यति भागवत , यशवंत वैष्णव आणि स्वप्निल भिसे हे तबला संगत करतील. तर संवादिनी साथ असेल चिन्मय कोल्हटकर ,सिद्धेश बिचोलकर व सुयोग कुंडलकर यांची.कथक साठी ईशान परांजपे,पार्थ भुमकर,अथर्व वैरागकर आणि स्वानंद राजोपाध्ये साथ करतील.

सदर महोत्सव सर्व संगीत रसिकांना खुला असणार आहे तरी सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: औंध संगीत महोत्सवाचे आयोजन कोण करते?

    Ans: शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

  • Que: औंध संगीत महोत्सवाची सुरुवात कधी झाली?

    Ans: या महोत्सवाची सुरुवात १९४० साली पं. अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा आणि त्यांचे चिरंजीव पं. गजाननबुवा जोशी यांनी केली.

  • Que: औंध संगीत महोत्सव सर्वांसाठी खुला आहे का?

    Ans: होय. हा महोत्सव सर्व संगीत रसिकांसाठी खुला असणार आहे.

Web Title: 86th aundh music festival october 30 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Brazil Election 2026 : ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांचा ऐतिहासिक विजय
1

Brazil Election 2026 : ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांचा ऐतिहासिक विजय

Nagpur News :जंगलातील संघर्षाला मिळणार नवा योद्धा ‘भीमा’ आणि ‘सुब्रमण्यम’ हत्तींची विदर्भात एन्ट्री
2

Nagpur News :जंगलातील संघर्षाला मिळणार नवा योद्धा ‘भीमा’ आणि ‘सुब्रमण्यम’ हत्तींची विदर्भात एन्ट्री

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा
3

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण
4

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.