Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :जंगलातील संघर्षाला मिळणार नवा योद्धा ‘भीमा’ आणि ‘सुब्रमण्यम’ हत्तींची विदर्भात एन्ट्री

Nagpur News : विदर्भातील जंगली हत्तींचे हल्ले रोखण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पातील भीमा आणि सुब्रमण्यम या दोन आशियाई हत्तींना कुमकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. कर्नाटकातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये त्यांची मदत घेतली जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 26, 2026 | 04:05 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका
  • महावतांच्या सुरक्षेवरही लक्ष दिले जाते
  • जंगली हत्तींच्या नियंत्रणासाठी कुमकी हत्तींची मदत
Nagpur News : विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जंगली हत्तींच्या वाढत्या वावरामुळे मानव-हत्ती संघर्षाचा प्रश्न गंभीर बनत आहे. या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने आता विशेष तयारी सुरू केली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘भीमा’ आणि ‘सुब्रमण्यम’ या दोन पाळीव आशियाई हत्तींना जंगली हत्तींचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षित झाल्यानंतर हे दोन्ही हत्ती विदर्भातील बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

Nagpur News : स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर

बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका

काही वर्षांपासून जंगली हत्तीचा कळप विदर्भातील पिकांचे आणि निवासी भागांचे नुकसान करीत आहे. तीन वर्षांपूर्वी जंगली हत्तींचा कळप छत्तीसगडमधून विदर्भात घुसला होता, जो सुरुवातीला गोंदिया येथे थांबला होता. त्यानंतर तो गडचिरोलीमार्गे तेलंगणा येथे गेला.

हा कळप महाराष्ट्र आणि तेलंगणा दरम्यान सतत फिरतो. यावर उपाय म्हणून वन विभाग सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि नियंत्रण योजना विकसित करीत आहे. आजपर्यंत त्यांचा वापर पेंच आणि आसपासच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या बचाव कार्यासाठी केला गेला आहे.

महावतांच्या सुरक्षेवरही लक्ष दिले जाते

जंगली हत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भीमा आणि सुब्रमण्यम यांना प्रशिक्षण देण्यासोबतच महावताची सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. जंगली हत्ती त्यांच्या आक्रमकतेसाठी कुप्रसिद्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बेशुद्ध करताना कोणतीही अनुचित घटना पडल्यास जीव धोक्यात येऊ शकतो.

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव

जंगली हत्तींच्या नियंत्रणासाठी कुमकी हत्तींची मदत

पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली येथे हत्ती शिबिर उभारण्यात आले आहे. या शिबिरात सध्या ५५ वर्षीय भीमा आणि २७ वर्षीय सुब्रमण्यम या दोन नर आशियाई हत्तींची देखभाल केली जात आहे. या दोन्ही हत्तींना ‘कुमकी हत्ती’ म्हणून प्रशिक्षित करण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे.

कुमकी हत्ती म्हणजे जंगली हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षितपणे दुसरीकडे वळवण्यासाठी तसेच बचाव मोहिमांमध्ये मदत करण्यासाठी प्रशिक्षित केलेले पाळीव हत्ती. जंगली हत्तींचा मानवी वस्त्यांमधील प्रवेश रोखणे आणि संघर्षाच्या परिस्थितीत वन कर्मचाऱ्यांना मदत करणे, ही त्यांची प्रमुख भूमिका असते.

वन विभागाच्या माहितीनुसार, भीमा आणि सुब्रमण्यम यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कर्नाटकातील अनुभवी माहुत आणि तज्ज्ञांचे पथक पेंच व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही हत्तींना जंगली हत्तींच्या हालचाली समजून घेणे, त्यांना नियंत्रित पद्धतीने दूर नेणे आणि बचाव मोहिमांमध्ये सहभागी होणे याचे प्रशिक्षण दिले जाईल.

विशेष म्हणजे, भीमा आणि सुब्रमण्यम यांना २०२३ मध्ये कर्नाटकातून महाराष्ट्रात आणण्यात आले होते. हे दोन्ही हत्ती मूळचे महाराष्ट्रात पकडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी योग्य अधिवास आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना कर्नाटकात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात आले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही हत्तींचा वापर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे. जंगली हत्तींच्या कळपांना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवणे, संभाव्य संघर्ष टाळणे आणि वन कर्मचाऱ्यांच्या बचाव मोहिमांना मदत करणे यासाठी त्यांची नियुक्ती होईल.

विदर्भात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी भीमा आणि सुब्रमण्यम कितपत प्रभावी ठरतात, याकडे आता वन्यजीवप्रेमी आणि वन विभागाचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Nagpur news a new warrior joins the struggle in the wildelephants bhima and subramaniam arrive in vidarbhacp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • elephant
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

86th Aundh Music Festival: औंधमध्ये शुक्रवारी रंगणार सुरांची मैफल! दिग्गज कलाकारांच्या स्वरांनी सजणार ८६ वा संगीत महोत्सव
1

86th Aundh Music Festival: औंधमध्ये शुक्रवारी रंगणार सुरांची मैफल! दिग्गज कलाकारांच्या स्वरांनी सजणार ८६ वा संगीत महोत्सव

Brazil Election 2026 : ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांचा ऐतिहासिक विजय
2

Brazil Election 2026 : ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांचा ऐतिहासिक विजय

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा
3

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण
4

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.