श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कापूर ठरेल वरदान! जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
घरात, देवघरात किंवा मुलांच्या खोलीत कायमच कापूर जळलेले जाते. यामुळे सगळीकडे कापूरचा सुगंध पसरतो आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. हा तणाव कमी करण्यासाठी कापूरचा वापर करावा. कापूराचा तीव्र पण स्वच्छ सुगंध तणावापासून सुटका मिळवून देतो.
सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरते. संध्याकाळच्या वेळी घरात नियमित एक किंवा दोन कापूर गोळ्या जाळल्यास घरात शांत वातावरण राहील.
केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केसांच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरते. वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कापूर वड्या रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर तयार केलेले तेल केसांवर लावून मसाज करावे.
हाडांमध्ये वाढलेल्या आणि हातापायांचे स्नायू दुखणे इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरते. कापूरच्या तेलाने हाडांना मालिश करावी.