टूथपेस्ट नॉनव्हेज असू शकतो का? अशाप्रकारे घरीच ओळखता येईल Veg अन् ‘Non Veg’ मधील फरक
होय, हे खर आहे. काही टूथपेस्ट हे प्राण्यांपासून मिळणाऱ्या घटकांपासून तयार केले जातात. ग्लिसरीन हा एक असा पदार्थ आहे, जो बहुतेक टूथपेस्टमध्ये आवर्जून वापरला जातो मात्र हे ग्लिसरीन बऱ्याचदा प्राण्यांच्या चरबीपासूनही तयार केले जाते
ग्लिसरीन हे टूथपेस्टमध्ये एक मॉइश्चरायझर सारखे वापरले जाते आणि ते वनस्पती किंवा प्राण्यांच्या चरबीपासून तयार केले जाते. काही फ्लेवरींग एजंट्स प्राण्यांच्या स्त्रोतापासून मिळवले जाऊ शकतात
टूथपेस्टमध्ये वापरले जाणारे पदार्थ जसे की, कॅल्शियम फॉस्फेट, जिलेटिन किंवा स्टीअरिक अॅसिड हे घटक देखील प्राणीज स्त्रोतांपासून तयार केले जातात.
आता व्हेज नाॅनव्हेज टूथपेस्टमधील फरक जाणून घेण्यासाठी तुम्ही टूथपेस्टच्या पॅकेजवर एकदा तपासून पाहू शकता. जर टूथपेस्टवर हिरवा डाॅट दिसत असेल तर तो शाकाहारी टूथपेस्ट आहे, हाच डाॅट जर लाल रंगाचा असेल तर तो टूथपेस्ट मांसाहारी आहे हे समजून जा
टूथपेस्टच्या पॅकवर घटकांची यादी दिलेली असते. हे घटक तपासून तुम्ही टूथपेस्ट व्हेज आहे की नाॅनव्हेज याचा शोध घेऊ शकता. सामान्यत: ऑरगॅनिक टूथपेस्टमध्ये प्राण्यांचे घटक वापरले जात नाहीत