
रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
रात्रीच्या वेळी हात सुन्न होणे ही अनेक लोकांसाठी एक सामान्य बाब असते. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हाताला मुंग्या येत असतील अशा समजूतीने त्याकडे लक्ष दिले जात नाही. ही तक्रार विशेषतः महिलांमध्ये सामान्य आहे. हात सुन्न होणे हे केवळ दुखापत किंवा झोपेच्या चुकीच्या पद्धतीने होत नाही, ते मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे किंवा न्यूरोलॉजिकल कारणांमुळे देखील असू शकते. नक्की रात्री हात सुन्न होण्याचे कारण काय असू शकते, त्यामागे कोणत्या आजाराचे कारण असू शकते का? जाणून घेऊयात.
मुख्य कारणे कोणती ?
घरी कसे तपासायचे?
तज्ज्ञांच्यां मते याबाबत आपण घरीही तपासणी करू शकतो. तुमचे हात मागे, म्हणजे उलटे करा. तुमचे मनगट वरच्या दिशेने आणि बोटे खाली दिशेने ठेवा. सुमारे दोन मिनिटे या स्थितीत रहा. जर या वेळेत तुमचे हात सुन्न झाले किंवा मुंग्या आल्या तर ते कार्पल टनेल सिंड्रोमचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, ताबडतोब न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. उपचार आणि प्रतिबंधः कार्पल टनेल सिंड्रोमवर उपचार करणे सहसा सोपे असते. डॉक्टर त्याबाचत उपचार देतात.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.