महाकुंभ 2025 चा शुभारंभ अखेर झाला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यात जगभरातील करोडो भाविक सामील झाले आहेत. हा देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम मानला जातो. कुंभमेळ्यात स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. या पवित्र स्नानासाठी प्रयागराजमध्ये देश-विदेशातून लोक येत असतात मात्र काही कारणांमुळे सर्वांनाच येथे जायला मिळत नाही. अशावेळी घरीच काही नियम आणि पद्धतींचे पालन करून तुम्ही कुंभमेळ्याच्या पुण्याचा लाभ घेऊ शकता.
Mahakumbh 2025: महाकुंभला जाता आले नाही? मग चिंता करू नका, घरीच करा हे काम; मिळेल गंगा स्नानाचा आशिर्वाद
शाही स्नानाचा काळ हा सूर्योदयापूर्वीचा असतो. अशात जर तुम्ही नदी किंवा सरोवराच्या जवळपास राहत असाल तर त्यातील पाणी घेऊन त्यात गंगाजल मिसळा आणि या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना सतत गंगा देवीचे स्मरण करत 'हर हर गंगे' या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल
कुंभ स्नान करताना नदीत पाचवेळा डुबकी मानायची परंपरा आहे. तुम्ही घरीच स्नान करत असाल तर मनातल्या मनात गंगा नदीचे स्मरण करा. या स्नानादरम्यान, साबण किंवा इतर रसायनांचा वापर करू नका
स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि ते सूर्याला अर्पण करा. याचप्रमाणे घरातील तुळशीच्या झाडालाही हे जल अर्पण करा
महाकुंभाच्या दिवशी दान करणे फार पुण्याचे काम मानले जाते. स्नान केल्यांनतर गरिबांना किंवा गरजूंना आवर्जून दान करा. तुम्ही अन्न, वस्त्र आणि धन अशा कोणत्याही प्रकारचे दान करू शकता
या दिवशी निरंकार उपवास ठेवा आणि सात्विक भोजनाचे सेवन करा. कांदा, लसूण आणि तामसिक खाद्य पदार्थ खाणे टाळा. यामुळे शरीर आणि मनाची शुद्धी होते