फोटो सौजन्य: iStock
जागतिक पातळीवर दाखल घेतली जाणार: युनेस्कोच्या यादीत महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश झाल्याने त्यांना जगभर प्रसिद्धी मिळणार. यामुळे विदेशी पर्यटक त्या ठिकाणाला भेट देणार, त्याबद्दल लिहिणार आणि ब्लॉग देखील करणार.
सरकार आणि युनेस्कोकडून मदत मिळणार: शिवरायांचे गडकिल्ले जपण्यासाठी सरकार आणि युनेस्कोकडून आर्थिक, योजना, इन्फ्रास्टकचरसाठी पाठबळ मिळणार. यामुळे माहिती फलक, रस्ते, टॉयलेट्स, इत्यादी सुविधा सुधारणार.
स्थानिक लोकांचा अभिमान वाढणार: साक्षात आपले एका इतिहासाचा भाग आहे आणि त्याची दाखल युनेस्कोने घेतली ही गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब ठरेल. याच ऐतिहासिक ठिकाणाची लोकं काळजी घेण्यास सुरुवात करतील.
संस्कृती आणि निसर्ग वाचवता येतो: युनेस्कोच्या या निर्णयामुळे जुनी मंदिरं, जंगल, गुहा, आणि प्राण्यांचे जातं होईल, जे पुढच्या पिढीला सुद्धा पाहायला मिळेल.
पर्यटकांची संख्या वाढणार: देश विदेशातील लोकं हे गडकिल्ले पाहायला येणार. यामुळे गाईड, हॉटेल, टॅक्सी, फूड स्टॉलच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार.