
बाळाच्या पाचवीला सटवाई नशिब लिहून जाते असं म्हणतात. या गावतल्या गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की सटुआईला नवसं केला की तो पूर्ण होतो गावची ही देवी जागृत देवस्थान म्हणून देखील ओळखलं जातं. नेरळ जवळील कोलीवली गावात पौष मासारंभला भरली जाणारी सटुआईची यात्रा एक दिवसाची असायची. मात्र मागील काही वर्षे या यात्रेने ट्रेंड बदललाय,कारण यात्रा आता 15 दिवसांची होऊ पाहत आहे.दरम्यान,नवस फेडायला येणारे भाविक यांच्या वर्दळीमुळे नेरळ परिसरातील व्यापार उदीम वाढला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ जवळ असलेल्या कोलिवली गावात सटुआईचे मंदिर आहे. त्या मंदिरात दरवर्षी पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरते. आपल्या बाळाच्या जणांचे भविष्य सटुआई लिहिते तसेच आपल्या बाळाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि अपत्य व्हावे म्हणून देखील विवाहित दाम्पत्य नवस करीत असतात. दरम्यान,ते नवस फेडण्यासाठी भक्त या यात्रेत मोठ्या संख्यने येत असतात. कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी निसर्गरम्य वातावरणात असलेले जागृत देवस्थान म्हणजेच कोलीवली गावची सटूआई.
नेरळ स्थानकापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर कोलीवली गावात सटूआईचे जागृत देवस्थान आहे. जन्म घेणाऱ्या प्रत्येक बाळाचे भविष्य सटुआई लिहून ठेवत असते अशी आख्यायिका असून त्या बाळाचे भविष्य उज्ज्वल राहावे यासाठी आणि अनेक दाम्पत्य आपल्या संतती सुख मिळावे यासाठी सटुआई ला नवस करीत असतात.त्यामुळे घेतलेला नवस फेडण्यासाठी कोलीवलीच्या सटुआईच्या भेटीसाठी भाविक हजारो च्या संख्येने येत असतात. त्या भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी प्रामुख्याने पौष मासारंभ या दिवशी भरणाऱ्या यात्रेला होत असते.
मागील तीन चार वर्षात यात्रेनंतर नवस फेडायला येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ लागली. यावर्षी रविवारी 21 डिसेंबर रोजी सटुआई ची यात्रा भरली होती.त्यानंतर दररोज शेकडो च्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी कोलीवली गावात येत आहेत. त्यांची गर्दी 24 डिसेंबर च्या रविवारी हजारोच्या संख्येने दिसून आली.त्यामुळे एक दिवसाच्या कोलीवली यात्रेला वेगळे रूप प्राप्त होत आहे. त्यातच यात्रेच्या वेळी आलेली खेळण्याच्या वस्तू यांची विक्री करणारी दुकाने,मिठाई ची दुकाने आजही कायम सुरू असल्याने यात्रेने आपला एक दिवसाची यात्रा हा ट्रेंड बदलला.
कोलीवली यात्रा आता 15 दिवसांची होऊ पाहत असल्याने नेरळ येथून कोलीवली येथे जाणारी प्रवासी वाहने यांचा व्यवसाय वाढला आहे.त्याचवेळी किराणा साहित्य,फळे,हार,पूजेचे साहित्य यांच्या वस्तूंची उलाढाल वाढली आहे. यात्रेने ट्रेंड बदलल्यामुळे या परिसरातील व्यापार उदीम देखील वाढला आहे.अशी नवस फेडण्यासाठी आलेले भाविक कोलीवली गावाच्या परिसरात झाडाची सावली शोधून जेवण बनवून खाऊन घरी परततात. एकावेळी हजारो भाविक येत असल्याने मिळेल त्या ठिकाणी झाडांच्या सावलीत चुलीवर जेवण बनविण्यासाठी जागा शोधत असतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक वन भोजन वन भोजन बनवून खाण्याचा आनंद घेत असतात.
Ans: सटुआई ही कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असलेल्या कोलीवली गावाची जागृत ग्रामदेवता आहे. गावाचे व गावकऱ्यांचे रक्षण करणारी देवी म्हणून तिची ओळख आहे.
Ans: लोकांची श्रद्धा आहे की बाळाच्या पाचवीला सटुआई बाळाचं नशीब लिहून जाते. तसेच संतती सुख, उज्ज्वल भविष्य, आरोग्य व मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला नवस केला जातो.
Ans: सटुआईचे जागृत देवस्थान कर्जत तालुक्यातील नेरळ स्थानकापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलीवली गावात आहे.