Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी यक्षिणी देवीच्या दरबारात विराजमान; मंडळाचे १०३ व्या वर्षात पदार्पण

मुंबई : चिंचपोकळी - गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळी चा चिंतामणी' (Chinchpoklicha Chintamani 2022) या नावाने प्रसिद्ध असणार्‍या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. यावर्षी मंडळ १०३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Sep 01, 2022 | 07:41 PM
चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी यक्षिणी देवीच्या दरबारात विराजमान; मंडळाचे १०३ व्या वर्षात पदार्पण
Follow Us
Follow Us:

गणेशोत्सवाच्या काळात जमणाऱ्या लोकवर्गणीतील ४० टक्के निधी हा गणेशोत्सवासह, नवरात्रौत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवावर खर्च होतो तर उर्वरित ६० टक्के निधी समाजकार्यासाठी वापरला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा पायंडा याच मंडळाने पाडला,पुढे तो अनेक मंडळांनी स्विकारला. चिंचपोकळी च्या चिंतामणी ला २०११ मध्ये ‘मुंबईचा राजा’ या किताबाने गौरविण्यात आले.

 

ग्रेट भेट…
मंडळाच्या गणेशोत्सवात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सारख्या राष्ट्रपुरुषांबरोबर शरद पवार, नारायण राणे, राज ठाकरे, अजित पवार यांसारखे राजकीय नेते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील शिल्पा शेट्टी, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, शिवाजी साटम, सायली संजीव, भाऊ कदम यांच्यासह मालिकेतील विविध कलाकारांनी भेट दिली आहे.

 

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यावर्षी सरकारने उत्सवातील नियमात शिथिलता आणल्याने चिंतामणी भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी आगमन सोहळ्यात जवळपास मुंबई तसेच ठाणे आणि इतर ठिकाणाहून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती.

 

यावर्षी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यक्षिणी दरबाराची सजावट साकारली असून यक्षिणीच्या विविध मुर्ती दरबारात साकारण्यात आल्या आहेत. या नेत्रदीपक दरबाराचे कला दिग्दर्शक अमन विधाते असून यासाठी प्रकाश योजना विशाल शेलार यांची आहे. तसेच चिंतामणी ची सुबक मुर्ती प्रसिद्ध मूर्तीकार रेश्मा खातू यांनी साकारली असून वेशभूषा प्रकाश लहाने यांची आहे. चिंतामणी ची सुबक मूर्ती १२ फुटाची असून संपूर्ण मूर्तीची उंची २० फूट आहे.

Web Title: Chintapoklis chintamani is seated in the darbar of yakshini devi this year nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2022 | 07:39 PM

Topics:  

  • chinchpoklicha chintamani
  • Ganeshotsav 2022
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
1

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
2

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
3

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन
4

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.