Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wadia Maternity Hospital: केट मिडलटन यांची मुंबईतील वाडिया प्रसूतिगृहाला भेट; डॉक्टर, नवमाता आणि कुटुंबीयांशी साधला संवाद

Wadia Maternity Hospital: ब्रिटनच्या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी बुधवारी मुंबईतील परळ येथील नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाला स्वतंत्र भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर, परिचारिका, नवमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2026 | 06:06 PM
केट मिडलटन यांचा स्वतंत्र दौरा; डॉक्टर, परिचारिका आणि नवमातांशी संवाद

केट मिडलटन यांचा स्वतंत्र दौरा; डॉक्टर, परिचारिका आणि नवमातांशी संवाद

Follow Us
Follow Us:
  • केट मिडलटन यांचा स्वतंत्र दौरा; डॉक्टर, परिचारिका आणि नवमातांशी संवाद
  • माता व नवजात बालकांच्या आरोग्यसेवेतील भारताच्या प्रगतीची घेतली माहिती
  • रुग्णालयाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व
 

मुंबई : माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यसेवेतील भारताची प्रगती जाणून घेण्यासाठी ब्रिटनच्या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी बुधवारी परळ येथील नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाला स्वतंत्र भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, नवमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत तसेच नवजात बालकांच्या संगोपनासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांची माहिती घेतली. १९२६ मध्ये स्थापन झालेले वाडिया प्रसूतिगृह यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रिन्सेस ऑफ वेल्स यांची भेट रुग्णालयासाठी विशेष महत्त्वाची ठरली.(Wadia Maternity Hospital)

राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

प्रिन्स विल्यम यांच्यापासून वेगळा कार्यक्रम करत केट यांनी या रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी प्रसूती आणि नवजात बालकांच्या उपचार विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. माता आणि बालकांच्या आरोग्याबरोबरच प्रसूतीनंतर कुटुंबांना मिळणारा आधार, बालकांच्या सुरुवातीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि उपचारपद्धती याविषयी त्यांनी जाणून घेतले. या वेळी भारतातील मातामृत्यूदरात झालेल्या सुधारणेचीही माहिती त्यांना देण्यात आली.

ग्रामीण आणि दुर्गम भागांतील गर्भवती महिलांना रुग्णालयात प्रसूतीसाठी आणण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या योजनांची माहितीही त्यांनी घेतली. प्रसूतीपूर्व तपासण्या, रुग्णालयातील प्रसूती आणि बालकांचे लसीकरण यासाठी महिलांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही कुटुंबीयांशीही केट यांनी संवाद साधला. नवजात बालकांच्या गंभीर आजारांमुळे पालकांना येणारा मानसिक ताण आणि अशा वेळी रुग्णालयाकडून मिळणारा आधार याबाबत त्यांनी चर्चा केली.

शताब्दी वर्षात भेटीचा विशेष सन्मान

वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिन्नी बोधनवाला यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स, लंडनच्या संरक्षक सदस्य असलेल्या प्रिन्सेस ऑफ वेल्स यांनी आमच्या रुग्णालयाला भेटीसाठी निवडणे ही संपूर्ण रुग्णालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आमचे प्रसूतिगृह शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना या सन्मानामुळे या वर्षाचे महत्त्व आणखी वाढले आहे. रुग्णसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी ही भेट प्रोत्साहन देणारी आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्याकडून मिळालेली प्रशंसा आणि सन्मान यामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच प्रोत्साहन मिळेल. असं डॉ. बोधनवला म्हणाल्या.

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर

💡

Frequently Asked Questions

  • Que: केट मिडलटन यांनी मुंबईतील कोणत्या रुग्णालयाला भेट दिली?

    Ans: ब्रिटनच्या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी परळ येथील नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाला भेट दिली.

  • Que: केट मिडलटन यांनी वाडिया प्रसूतिगृहाच्या भेटीदरम्यान कोणाशी संवाद साधला?

    Ans: त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, नवमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

  • Que: नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाची स्थापना कधी झाली?

    Ans: नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, यंदा रुग्णालय शताब्दी वर्ष साजरे करत आहे.

Web Title: Kate middleton visits nawrosjee wadia maternity hospital mumbai sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Hospital
  • Mumbai

संबंधित बातम्या

Anil Agarwal Donation : मुंबईत विद्यार्थिनींसाठी वसतिगृह; अनिल अग्रवाल यांचे ५ कोटींचे योगदान
1

Anil Agarwal Donation : मुंबईत विद्यार्थिनींसाठी वसतिगृह; अनिल अग्रवाल यांचे ५ कोटींचे योगदान

Mumbai Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणकरांचा प्रवास होणार सुसाट! कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो दाखल; प्रवासी सेवेकडे महत्त्वाचे पाऊल
2

Mumbai Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणकरांचा प्रवास होणार सुसाट! कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो दाखल; प्रवासी सेवेकडे महत्त्वाचे पाऊल

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात
3

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.