आरोग्यासाठी गुणकारी असलेले नारळ पाणी 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरते घातक
नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरातून अतिरिक्त पोटॅशियम काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हायपरक्लेमिया म्हणजेच रक्तातील पोटॅशियम वाढून हृदयाचे थोडे अनियंत्रित होतात.
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन केले जाते. पण ज्या व्यक्तींचा रक्तदाब अतिशय कमी असेल त्यांनी नारळ पाणी पिऊ नये. यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा वाढू शकतो.
अनेकांना नारळ पाण्याचे सेवन केल्यानंतर अॅलर्जी होते. नारळ पाणी पिल्याने त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात.
नारळ पाण्यात असलेले रेचक गुणधर्म शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम करतात. अतिसार, अपचन किंवा आतड्यांसंबंधी सिंड्रोम वाढून पोटातील आतडयांना हानी पोहचते.
नारळ पाणी रक्तदाबावर परिणाम करते. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर गुंतागुंत होण्याची जास्त भीती असते. शस्त्रक्रियेच्या किमान 2 आठवडे आधी आणि नंतर नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.