सकाळी उठल्यानंतर नियमित करा बीटच्या रसाचे सेवन, महिलांच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक
बीटमध्ये असलेले नायट्रेट्स उच्च रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी मदत करतात. याशिवाय बीट खाल्यामुळे मेंदू आणि हृदयाच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत.
बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबर युक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी बीटचा रस प्यावा. यामध्ये असलेली अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरात होणारी जळजळ, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतात.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि आरोग्य सुधारते.
केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही हेअर केअर प्रॉडक्टचा वापर न करता आहारात बीटच्या रसाचे सेवन केल्यास महिनाभर फरक दिसून येईल.