धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवतात. वय वाढल्यानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. रक्तात वाढलेल्या युरिक अॅसिडमुळे सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात इत्यादी समस्या उद्भवतात. युरिक अॅसिड वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील प्यूरीन प्रोटीनमधून तुटणारा कचरा रक्तात मिक्स होतो, त्यानंतर तो किडणीपर्यंत पोहचतो आणि लघवीवाटे बाहेर पडून जातो. यामुळे तळपायांमध्ये वेदना, आग, टाचा दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. सामान्य वाटणाऱ्या याच लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय. (फोटो सौजन्य – istock)
रक्तात वाढलेले Uric Acid कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा 'या' पेयांचे सेवन, कमी खर्चात मिळेल दुखण्यापासून आराम

सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे लघवीवाटे शरीरातील सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल.

युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी ओवा प्रभावी मानला जातो. ओव्याचे पाणी बनवून उपाशी पोटी प्यायल्यास सकारात्मक बदल दिसून येईल. ओव्यामध्ये अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी अक्सिडेंट गुणधर्म असतात.

यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करून प्यावे. एक ग्लास पाण्यात एक किंवा दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करून प्यायल्यास शरीराला असंख्य फायदे होतील.

जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्याच्या सेवनामुळे यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यास मदत होते आणि सांध्यांना आलेली सूज कमी होते.

शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात.






