शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता निर्माण भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पेयांचे सेवन
पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित पालक सफरचंदच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
बीटमध्ये लोह, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय गाजरमध्ये विटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात आढळून येते. शरीरात वाढलेला अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमित बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.
विटामिन सी युक्त स्ट्रॉबेरी आणि किवीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले इतर घटक शरीरात रक्ताची पातळी वाढवण्यास मदत करतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. मेथी दाण्यांमध्ये लोह, फायबर आणि प्रथिने आढळून येते. या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
तीळांमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळून येते. याशिवाय मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी गूळ अतिशय प्रभावी आहे. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरात रक्त वाढू लागते.