उन्हाळ्यात अॅसिडिटीपासून तात्काळ अराम मिळवण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
वर्षाच्या बाराही महिने बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडी खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले पाणी शरीरात थंडावा कायम टिकवून ठेवतात.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाणी प्यावे. यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना लिंबू पाण्याचे सेवन करावे.
नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
जेवणानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाण्याचे सेवन करावे. हे पाणी शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप पाणी प्यावे.
उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे मानले जाते. यामुळे शरीर थंड राहते. अॅसिडिटी, अपचन आणि जळजळ कमी करण्यासाठी दह्याचे किंवा ताकाचे सेवन करावे.