थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' ड्रायफ्रुटसचे सेवन
मनुक्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते,ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
बदामामध्ये विटामिन ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. भिजवलेले बदाम खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात.
पिस्त्यामध्ये विटामिन बी 6, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी गुणधर्म आढळून येतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिस्ता खायला खूप आवडतो.
अक्रोडचे सेवन केल्यामुळे मेंदूच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, विटामिन ई आणि मॅग्नेशियम आढळून येते.
खजूरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह आढळून येते, ज्यामुळे शरीरातील कमी झालेली रक्ताची पातळी सुधारण्यास मदत होते.