स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज करा 'या' पदार्थांचे सेवन
सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खाल्ल्यास शरीरात ऊर्जा कायम टिकून राहील. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि विटामिन बी६ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केळी खाल्ल्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात.
सकाळच्या नाश्त्यात कोणत्याही तिखट तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी ओट्स खावेत. ओट्समध्ये तुम्ही कोणतीही फळे किंवा ड्रायफ्रुटस टाकून तुम्ही खाऊ शकता. ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने इत्यादी घटक आढळून येतात.
अंड्यामध्ये उच्च प्रथिने आणि अमीनो आम्ल मोठ्या प्रमाणावर आढळून येते. अंडी खाल्ल्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते. यामध्ये असलेले विटामिन बी १२ आणि लोह शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करतात.
ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे.
भूक लागल्यानंतर तेलकट पदार्थ खाण्याऐवजी बदाम, अक्रोड, चिया बियाणे आणि अळशीच्या बिया खाव्यात. या बियांमध्ये निरोगी चरबी, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि प्रथिने आढळून येतात.