Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेह- कोलेस्ट्रॉल होईल कायमचा गायब! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर होईल स्वच्छ

चुकीच्या आहारामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2025 | 08:25 AM
मधुमेह- कोलेस्ट्रॉल होईल कायमचा गायब! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पदार्थांचे सेवन

मधुमेह- कोलेस्ट्रॉल होईल कायमचा गायब! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप आणि चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अपचन, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तात वाढलेल्या साखरेचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. सकाळी उठल्यानंतर शरीर शुद्ध अवस्थेमध्ये असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीराची ऊर्जा वाढवतात.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल भाजीचे सेवन, शरीराला होतील फायदे

लसूण:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मधात किंवा तुपात भाजलेली लसूण खाल्यास शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल आणि रक्त पातळ होण्यास मदत होईल. लसूणमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक घटक आढळून येतात. लसूण केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एक पाकळी लसूण खावी. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लसूण गुणकारी ठरतो.

गूळ:

स्वयंपाक घरातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना गुळाचा वापर केला जातो. नैसर्गिक गोडवा आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गूळ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. सकाळी उठल्यानंतर ब्रश न करता कोमट पाण्यासोबत गुळाचा बारीक खडा चावून खाल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांमधील हालचाल सुलभ होण्यासाठी गूळ खावे. शरीरात साचलेले हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गूळ खावे.

दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे दात अस्वच्छ दिसतात? मग अभिनेत्री निया शर्माने सांगितलेला ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी

भिजवलेले मनुके:

आंबट गोड चवीचे मनुके लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. एक ग्लास पाण्यात मनुके भिजवत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी मनुके आणि पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. मनुकामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि विटामिन बी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मनुके खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Diabetes cholesterol will disappear forever consume these foods on an empty stomach after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • gut health
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

सावधान! नियमित लिपस्टिक लावणे ओठांसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे, जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
1

सावधान! नियमित लिपस्टिक लावणे ओठांसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे, जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा मिल्की मशरूमचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
2

मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा मिल्की मशरूमचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ
3

आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका
4

खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.