फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात करा या पदार्थांचे सेवन
विटामिन सी, कॅरोटीनोइड्स, फोलेट आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध असलेली ब्रोकोली आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात ब्रोकोलीचे सेवन करावे.
आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते. आल्याचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांचे डिटॉक्सिफिकेशन आणि फुफ्फुसातील प्रदूषक काढून टाकण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस् आढळून येते, ज्यामुळे दमा आणि श्वसनासंबंधित इतर समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच यामध्ये दाहक-विरोधी एजंट गुणधर्म आढळून येतात.
रोजच्या आहारात लसूणचे सेवन करावे. ज्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. लसूणीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, ग्लूटाथिओन इत्यादी घटक आढळून येतात.
फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात सफरचंदचे सेवन करावे. सफरचंद खाल्यामुळे बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. फुफ्फुसांच्या कार्यासाठी विटामिन सी, ई आणि बीटा कॅरोटीन अत्यंत आवश्यक आहे.