मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन भिजवलेले अक्रोड खावेत. यामुळे शरीरासह मेंदूला अनेक फायदे होतात. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ई आणि पॉलीफेनॉल इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराच्या कोणत्याही अवयवाला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेले दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूमधील जळजळ कमी करतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ब्लूबेरी खायला खूप आवडतात. निळ्या रंगाचे नाजूक फळ मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात.
रोजच्या आहारात नियमित एक तरी पालेभाजी खावी. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. याशिवाय यामध्ये विटामिन के, ल्युटीन, फोलेट आणि बीटा-कॅरोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
चॉकलेट खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण कायमच साखर युक्त चॉकलेटचे सेवन करण्याऐवजी डार्क चॉकलेट खावे. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात.