आरोग्यासंबंधित गंभीर समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या भाज्यांमध्ये असलेले गुणधर्म शरीरात वाढलेली उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात.
शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. हळदीच्या पाण्यात असलेले गुणधर्म शरीरासाठी आवश्यक ठरतात.
आल्यामध्ये जिंजरॉल कंपाऊंड आणि दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. स्नायू आणि सांध्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आल्याच्या चहाचे किंवा पाण्याचे सेवन करावे.
सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन आणि ट्यूना इत्यादी चरबीयुक्त माशांचे आहारात सेवन केल्यास शरीरात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतील.
दैनंदिन आहारात स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी इत्यादी आंबट फळांचे सेवन करावे. या फळांमध्ये अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात.