सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन
तिखट तेलकट पदार्थांचे सेवन करून शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे गॅस, ऍसिडिटी, अपचन आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळेल.
चिया सीड्सचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात चिया सीड्स टाकून रात्रभर किंवा १ तास भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.
वाढलेले वजन करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
चिया सीड्समध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत राहतात. हाडांची ताकद टिकून ठेवण्यासाठी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे.
हृदयाच्या आरोग्यासाठी चिया सीड्स अतिशय प्रभावी ठरतात. यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयाला अनेक फायदे होतात.