फळे खाण्याचे फायदे
विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे.
नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंदमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराचे आजारांपासून नुकसान होत नाही. सफरचंद मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, फायबर, विटामिन सी फुफ्फुसांच्या कार्यसाठी अतिशय प्रभावी आहे.
पपई खाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाइम घटक आढळून येतो. यामुळे श्वसनलिका शुद्ध राहते. शिवाय पपई फुफ्फुस डिटॉक्स करण्याचे काम करतात.
विटामिन सी युक्त अननसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अननस सगळ्यांचं खूप आवडतो. बाजारामध्ये सर्वच ऋतूंमध्ये अननस उपलब्ध असतात. शिवाय यामध्ये असलेले एन्झाइम श्वसननलिकेला शुद्ध करण्याचे काम करते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष खायला खूप आवडतात. द्राक्ष खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि विटामिन सी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. द्राक्ष फुफ्फुस स्वच्छ करण्याचे काम करते.