Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips: डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो सांधेदुखीचा त्रास, आरोग्यासंबंधित दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सांधेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2026 | 12:45 PM
डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो सांधेदुखीचा त्रास, आरोग्यासंबंधित दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे

डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो सांधेदुखीचा त्रास, आरोग्यासंबंधित दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभरात किती पाणी प्यावे?
कमी पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला कोणती हानी पोहचते?
पाण्याच्या कमतरतेमुळे सांधे दुखी होते का?

दीर्घकाळ निरोगी आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये आणि इतर अनेक कारणांमुळे कमीत कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाते. कमी पाणी प्याल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते. यामुळे चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येणे, मुरूम, पचनक्रिया बिघडणे, सांध्यांमध्ये वेदना वाढणे, हाडांमध्ये वेदना वाढणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे महिलांमध्ये लघवीसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर लघवी करताना वेदना होणे, युटीआय इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

जड वस्तू उचलल्या नसतानाही किंवा चुकीच्या पद्धतीने बसलेले नसतानाही कधी अचानक कमरेत दुखणे जाणवले आहे का? बहुतेक वेळा अशा वेदनांचे कारण चुकीची देहबोली, स्नायूंवर आलेला ताण किंवा इजा असे मानले जाते; मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणारे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. शरीरातील पाणी कमी झाले, तर त्याचा थेट परिणाम पाठीच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि वेदना प्रत्यक्ष जाणवू शकतात. मानवी मणक्यांची रचना नीट कार्यरत राहण्यासाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील द्रवांचे प्रमाण कमी झाले की, त्याचा परिणाम मणक्यांमधील डिस्क, सांधे, स्नायू आणि मज्जासंस्थेवर होतो.

पाण्याच्या कमतरतेमुळे पाठदुखी कशी होते, हे समजून घेतल्यास त्यामागील प्रक्रिया अधिक स्पष्ट होते. मणक्यांमधील डिस्क या उशांसारख्या काम करतात. या डिस्क साधारणतः ८० टक्के पाण्याने बनलेल्या असतात. शरीरात पाणी कमी झाले की, या डिस्क कोरड्या पडू लागतात, त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि धक्के शोषून घेण्याची क्षमता घटते.

परिणामी, मणक्यावर अधिक ताण येतो आणि वेदना वाढतात. दीर्घकाळ पाण्याची कमतरता राहिल्यास डिस्क झिजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते किंवा आधीच असलेल्या स्लिप डिस्कसारख्या तक्रारी तीव्र होऊ शकतात. पाठीचे स्नायू सुरक्षित राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाईटस आवश्यक असतात. शरीरातील सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समतोल बिघडला की स्नायूंमध्ये अचानक आकडी आणि ताठरपणा निर्माण होतो. यामागे पाण्याची कमतरता कारणीभूत असू शकते.

वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन! सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर

सांध्यामध्ये असलेले सायनोव्हियल द्रव हाडांमधील घर्षण कमी करतो. शरीरात पाणी कमी झाले, की या द्रवाचे प्रमाण घटते. परिणामी, हाडामधील घर्षण वाढते, कडकपणा जाणवतो आणि हालचाल करताना वेदना होतात. कमरेच्या आणि पाठीच्या भागात ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. याखेरीज शरीर निर्जलित अवस्थेत असताना मज्जासंस्थेची कार्यक्षमता कमी होते, वेदनांची जाणीव अधिक तीव्र होते आणि अगदी किरकोळ हालचालीनीही दुखणे जाणवू लागते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवसभरात किती पाणी प्यावे?

    Ans: प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वय, लिंग, वजन आणि हवामानानुसार बदलते, पण साधारणपणे ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

  • Que: पाणी कसे प्यावे?

    Ans: एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी घोट घोट प्या.

  • Que: पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

Web Title: Dehydration can worsen joint pain and these serious health related symptoms may begin to appear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल कायमच दूर
1

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल कायमच दूर

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर
2

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

आवडीने खाल्ला जाणारा मुळा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, चुकूनही करू नका सेवन
3

आवडीने खाल्ला जाणारा मुळा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, चुकूनही करू नका सेवन

बुधवार-गुरुवारी मृत्यूचा सर्वाधिक धोका! अचानक मरणाचे प्रमाण घरीच जास्त, जाणून घ्या सविस्तर माहिती
4

बुधवार-गुरुवारी मृत्यूचा सर्वाधिक धोका! अचानक मरणाचे प्रमाण घरीच जास्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.