विटामिन सी मिळवण्यासाठी सप्लिमेंट्स घेण्याऐवजी आहारात करा 'या' फळांचे सेवन
आवळा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला विटामिन सी मिळेल. यासोबतच त्वचा आणि केसांनासुद्धा अनेक फायदे होतील.
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये किवी हे फळ उपलब्ध आहे. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात किवीचे सेवन करावे. किवीमध्ये विटामिन सी भरपूर असते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. पेरूमध्ये असलेले पोषक घटक शरीराला योग्य पोषण देतात. यामध्ये संत्र्यापेक्षा जास्त विटामिन सी आढळून येते.
पपई खाल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले विटामीन शरीरासह त्वचेला सुद्धा पोषण देते. दैनंदिन आहारात पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित पपई खावी.
लाल भडक स्ट्रॉबेरीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. त्यामुळे विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी स्ट्रॉबेरी खावी.