Covid-19 पासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन
चवीला आंबटगोड असलेली संत्री आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतात. यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता.
विटामिन सी युक्त आवळ्याचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे तुम्ही नियमित एक आवळा किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकता.
हिरव्या पालेभाज्या खायला अनेक लोक टाळतात. मात्र हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. आहारात हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारेल.
जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे पदार्थाचा रंग आणि चव वाढते. याशिवाय सर्दी, ताप किंवा खोकला आल्यास रात्रीच्या वेळी हळदीच्या दुधाचे सेवन करावे.
जेवणात नेहमीच डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यात प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे डाळ. रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचे नियमित सेवन केल्यास साथीच्या आजारांची लागण होणार नाही.