शरीराला ऊर्जा देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा 'या' हेल्दी पदार्थांचे सेवन
सकाळच्या नाश्त्यात ओट्स खावे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोषक तत्व आढळून येतात. त्यामुळे तुम्ही दुधातील किंवा मसाला ओट्स बनवून सुद्धा खाऊ शकता. ओट्स बनवल्यानंतर त्यासोबत कोणत्याही फळाचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतील.
लहान मुलांसह अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे वेगवेगळ्या फळांपासून तुम्ही स्मूदी बनवून पिऊ शकता.
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नियमित दोन अंडी खावी. अंड्यांमध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे ऑम्लेट किंवा अंड्याची बुर्जी बनवून चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अंड खाल्यामुळे पोट भरलेले राहते.
दही पोहे खायला सगळ्यांचं खूप आवडतात. वाटीभर दह्यात पोहे भिजवत ठेवा. त्यानंतर त्यात डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची आणि कांदा टाकून खाल्यास पोट भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील.
पांढरा ब्रेड खाण्याऐवजी सकाळच्या नाश्त्यात गव्हाच्या ब्रेडचे सेवन करावे. या ब्रेडवर पीनट बटर लावून खाल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल आणि शरीराला अनेक फायदे होतील.