रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' सुका मेव्याचे सेवन
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बदाम खाण्यास दिले जातात. भिजवलेल्या बदामाचे पाणी नियमित प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ आणि दाह कमी होतो. नियमित दोन किंवा तीन भिजवलेले अक्रोड आणि त्याचे पाणी प्यावे.
मनुक्यांमध्ये लोह आणि विटामिन सी असते. पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या मनुक्यांचे नियमित सेवन केल्यास रक्ताची कमतरता भरून निघेल आणि शरीरातील हाडे कायमच मजबूत राहतील.
अंजीरमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अनेक महत्त्वाचे जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील हालचाल सुलभ राहते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाही.
मनुका, मोठे काळे मनुके इत्यादींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच रक्त शुद्ध होते.