थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा 'या' लाल फळाचे सेवन
डाळिंब खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये विटामिन सी, के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सर्दी खोकल्याच्या संसर्गापासून शरीराचा बचाव करण्यासाठी डाळिंबाचे दाणे खावेत.
नियमित डाळिंबाचे सेवन केल्यास पॉलीफेनॉल्स ब्रेस्ट, प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींची वाढ होत नाही. याशिवाय शरीराची पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी डाळिंब खावे.
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे किंवा बीटच्या रसाचे सेवन करावे.
डाळिंबामध्ये आढळून येणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. याशिवाय रक्त शुद्ध होऊन त्वचेवर आलेले पिंपल्स आणि इतर समस्यांपासून सुटका मिळते.
थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी झालेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. महिनाभर नियमित एक ग्लास डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.