'या' पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
दूध, दही आणि चीज इत्यादी कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत राहतात. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात.
सुका मेवा, अक्रोड, बदाम इत्यादी सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत राहतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, निरोगी चरबी आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
तिळाच्या पांढऱ्या बियांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे हाडांमध्ये वाढलेला वेदना कमी होतात.
अंड्याच्या आतमध्ये असलेल्या पिवळ्या घटकांमुळे शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण होत नाही. सकाळीच्या नाश्त्यात नियमित एक अंड खाल्ल्यास शरीरात कॅल्शियम टिकून राहील.
टोफू, सोया दूध आणि सोयाबीन इत्यादी अनेक पदार्थांमध्ये कॅल्शियम आढळून येते. शाहाकारी लोकांनी हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात सोया उत्पादनाचे सेवन करावे.