जेवणानंतर कधीच तयार होणारी आतड्यांमध्ये गॅस! 'या' पदार्थांचे सेवन केल्यास अन्ननलिकेत वाढलेले पित्त होईल कमी
जेवण झाल्यानंतर सगळ्यांचं बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे पोटात वाढलेला गॅस किंवा अपचन कमी होते. याशिवाय बडीशेप खाल्ल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
आतड्यांमधील हालचाल सुलभ ठेवण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. जिरं खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. जेवण बनवताना जिऱ्याचा वापर केल्यास अन्नपदार्थाची चव सुधारते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.
पोटात दुखल्यानंतर ओवा खाल्ला जातो. याशिवाय तुम्ही ओव्याच्या पाण्याचे सुद्धा सेवन करू शकता. ओवा खाल्ल्यामुळे आतड्यांमधील गॅस, ऍसिडिटी आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल.
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी हिरवी वेलची खाल्ली जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. वेलची खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचतात.
जेवणातील अनेक पदार्थ बनवताना धन्यांच्या पावडरचा वापर केला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात.