Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी आणि नियम

Dhanteras Gold Shopping Important : दीपावली आणि धनतेरसच्या पवित्र मुहूर्तावर सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. मात्र, घाईघाईत किंवा अज्ञानामुळे सराफा बाजारात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 24, 2026 | 03:31 PM
धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ( सौजन्य - सोशल मीडिया )

धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय?
  • त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी
  • या नियमांकडे दुर्लक्ष करु नका
Dhanteras Gold Shopping Important : भारतात सोना – चांदी हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी दसरा दिवाळीचा मुहुर्त बराच शुभ मानला जातो. त्यात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि मौल्यवान दागिने खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या बाजारात ग्राहकांची झुंबड उडते. लोक आपले आवडते दागिने खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये गर्दी करतात. सुंदर डिझाईन्स आणि आकर्षक ऑफर्सला लोकं आकर्षित होतात आणि दागिन्यांची खरेदी करतात पण ही खरेदी कधीकधी बरीच महागडी ठरू शकते. ( Dhanteras Gold Shopping Important ) 

तुमची खरेदी सुरक्षित आणि पैशाचे योग्य मूल्य देणारी आहे याची खात्री करण्यासाठी दागिन्यांची शुद्धता, प्रमाणीकरण आणि किंमत याबद्दल अचूक माहिती असणे महत्त्वाचे आहे. दागिने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जाणून घेऊयात.

Bank Of India च्या भागधारकांची चांदी! दुसऱ्या तिमाहीत बँकेने कमावला तब्बल 3202 कोटींचा निव्वळ नफा; पाहा कशी राहीली कामगिरी

हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी स्पेशल प्रमाणपत्रक आवश्यक

सोन्यावरील हॉलमार्क त्यात जडवलेल्या हिऱ्याची सत्यता किंवा गुणवत्ता प्रमाणित करत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही हिऱ्याची अंगठी, नेकलेस किंवा कानातले खरेदी करताना डायमंड ग्रेडिंग रिपोर्टची विनंती करणे महत्त्वाचे आहे. या रिपोर्टमध्ये हिऱ्याचा कट, रंग, स्पष्टता आणि वजन यासारखी माहिती स्पष्टपणे समाविष्ट असते. GIA आणि IGI सारख्या संस्था डायमंड ग्रेडिंग रिपोर्ट जारी करतात. ग्राहकांनी रिपोर्टमधील तपशील ते खरेदी करत असलेल्या हिऱ्याशी जुळवून पाहणं आवश्यक आहे. उपलब्ध असल्यास, संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्राच्या माहितीची पडताळणी करावी.

सोन्याच्या शुद्धतेसाठी BIS हॉलमार्क असावा

सोन्याचे दागिने खरेदी करताना, केवळ त्याच्या चमक किंवा डिझाइन पाहणं पुरेसे नाही. ग्राहकांनी दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS चा हॉलमार्क, शुद्धता चिन्ह आणि सहा-अंकी HUID कोड आहे की नाही हे तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, २२-कॅरेट सोन्यावर ९१६ चा शुद्धता मार्किंग असतो आणि १८-कॅरेट सोन्यावर ७५० चा शुद्धता मार्किंग असतो. खरेदीदार BIS केअर ॲपच्या व्हेरिफाय HUID फीचरचा वापर करून हॉलमार्कची माहिती देखील तपासू शकतात. यामुळे दागिने ओळखण्यास आणि प्रविष्ट केलेल्या तपशीलांशी जुळवून पाहण्यास मदत होते.

बिल आणि घडणावळीचे चार्जेस नक्की तपासा

दागिने खरेदी करताना फक्त सोन्याच्या प्रति ग्रॅम दराची तुलना करणे पुरेसे नाही. दागिन्यांच्या किमतीमध्ये सोन्याचे वजन, वापरलेल्या खड्यांची किंमत, घडणावळीचे शुल्क आणि त्यावरील टॅक्स यांचा समावेश असणार आहे. म्हणून, दुकानदाराकडून किमतीचा संपूर्ण तपशील विचारून आणि वेगवेगळ्या सराफांच्या ऑफर्सची तुलना करणं आवश्यक आहे.
खरेदी पूर्ण झाल्यावर वैध बिल मिळवण्याची खात्री करा. त्यावर दागिन्यांचे वजन, शुद्धता, किंमत आणि इतर महत्त्वाचा तपशील स्पष्टपणे नमूद केलेला असावा. तसेच, हिऱ्याची किंवा इतर रत्नांची प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवा.

खरेदी करताना घाई करु नकात

धनतेरसच्या शुभ मुहूर्तांमुळे आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर्समुळे ग्राहक घाईघाईने निर्णय घेण्याची चुक करतात. पण महागडे दागिने खरेदी करताना गुणवत्ता आणि प्रमाणपत्रांना तितकंच महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे. सोन्याची शुद्धता, हिऱ्यांची गुणवत्ता आणि किंमत याबद्दल संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच खरेदी करा. यामुळे चुकीचे उत्पादन खरेदी करण्याचा किंवा सणासुदीच्या काळात वाद निर्माण होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

जडाऊ दागिने खरेदी करताना विशेष सावधानगिरी

धनतेरसच्या काळात पारंपरिक पोलकी आणि जडाऊ दागिन्यांनाही मागणी असते. या दागिन्यांमध्ये अनकट हिरे, रंगीत रत्ने आणि नाजूक कलाकुसर असू शकते. असे दागिने खरेदी करण्यापूर्वी, दुकानदाराला वापरलेल्या रत्नांबद्दल, त्यांच्या गुणवत्तेबद्दल आणि त्यांच्यावर काही प्रक्रिया केली आहे का याबद्दल विचारा. ही सर्व माहिती लेखी स्वरूपात असणे उत्तम. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची खरी रचना आणि मूल्य समजण्यास मदत होते.

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनतेरसवर सोने खरेदी करताना शुद्धता कशी तपासावी?

    Ans: सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क आणि 6 अंकी HUID क्रमांक पाहूनच दागिने खरेदी करावेत, ज्यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री होते.

  • Que: हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणती दक्षता घ्यावी?

    Ans: हिरे खरेदी करताना नेहमी त्याचे प्रमाणे प्रमाणित प्रमाणपत्र मागितले पाहिजे, ज्यामध्ये हिऱ्याची प्रत, कट, कलर आणि स्पष्टता नमूद केलेली असते.

  • Que: दागिन्यांवर आकारले जाणारे 'मेकिंग चार्जेस' कसे कमी करावेत?

    Ans: वेगवेगळ्या दागिन्यांच्या डिझाइननुसार मेकिंग चार्जेस भिन्न असतात. त्यामुळे विविध ज्वेलर्सकडील दर तपासून घ्यावेत आणि शक्यतो फिक्स रेट वा कमी घडणावळ असलेले दागिने निवडावेत.

Web Title: Dhanteras gold and diamond buying guide rules and tips ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Dhanteras festival
  • Diwali
  • Gold
  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या
1

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या

Gold Price Drop 5 Percent : एका महिन्यांत 5 % नी लुढकले सोन्याचे भाव! खरेदी करण्याची उत्तम वेळ कधी? काय म्हणजे तज्ज्ञ?
2

Gold Price Drop 5 Percent : एका महिन्यांत 5 % नी लुढकले सोन्याचे भाव! खरेदी करण्याची उत्तम वेळ कधी? काय म्हणजे तज्ज्ञ?

PM Kisan Yojana 24 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना बंपर गिफ्ट! दिवाळीत खात्यात जमा होणार ₹5000 चा बोनस, कोणाला मिळणार लाभ?
3

PM Kisan Yojana 24 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना बंपर गिफ्ट! दिवाळीत खात्यात जमा होणार ₹5000 चा बोनस, कोणाला मिळणार लाभ?

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी
4

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.