भारतात चहा-कॉफी पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते तर काही लोक दिवसभर चहा-कॉफी पित राहतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कित्येक जण तर दिवसाला अनेक कप कॉफी आणि चहा पित असतात. कॉफी आणि चहामध्ये असणारे कॅफिन आपल्याला एनर्जी जरी देत असले तरी त्यांचे अतिसेवन हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. जर हे मोठ्यासाठी एवढे घटक असेल तर लहान मुलांचे काय? चला जाणून घेऊया.
लहान मुलांना चहा किंवा कॉफी दिल्याने काय होते (फोटो सौजन्य: iStock)

लोकं फक्त सकाळी चहा आणि कॉफी घेतात आणि काही दिवसभरात एका वेळी एक कप पितात. चहा-कॉफी किती फायदेशीर आणि हानिकारक आहे हे प्रौढांना माहीत असते, पण मुलांना ते माहीत नसते.

मुलांना चहा-कॉफीपासून दूर ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बालरोगतज्ज्ञांनीही याबाबत सतर्क केले आहे. चला जाणून घेऊया मुलांना कोणत्या वयात चहा-कॉफी द्यावी आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

बालरोगतज्ञांच्या मते, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही चहा-कॉफी देऊ नये. ते त्यांचे नुकसान करू शकते. त्यामुळे त्यांची वाढ देखील थांबू शकते.

यामुळे गॅस्ट्रिक ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी आणि क्रॅम्प्स सारख्या समस्या देखील होऊ शकतात. परिणामी मुलांची झोपही भंग पावते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आढळते, ज्यामुळे मुलांचे दात आणि हाडे कमकुवत होऊ शकतात. अनेक लहान मुलांनाही चहाचे व्यसन असते, त्यामुळे ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.






