मुस्लीम देशात अचानक 4000 वर्ष जुनं शहर जमिनीतून आलं बाहेर, हैराण करणाऱ्या गोष्टी आल्या समोर
सौदी अरेबियाच्या वायव्य भागातील खैबर वाळवंटात 4000 वर्षे जुन्या शहराचे अवशेष पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडले आहेत. या प्राचीन वस्तीला अल-नताह असे नाव देण्यात आले आहे
संशोधकांचा असा विश्वास आहे की हे शहर कांस्ययुगाच्या सुरुवातीचे आहे, जेव्हा मानवी समाज भटक्या जीवनातून कायमस्वरूपी वसाहतीकडे जात होता. हा शोध पुरातन काळातही या भागात प्रगत संस्कृती अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. या अभ्यासाचा तपशील प्लस वन नावाच्या मासिकात प्रसिद्ध झाला आहे
अंदाजानुसार, इ.स.पूर्व 2400 च्या सुमारास ही वस्ती स्थापन झाली आणि सुमारे 1400 BC पर्यंत येथे जीवन चालू असावे. या वसाहतीत सुमारे 500 लोक राहत होते
अल-नताह अंदाजे 2.6 हेक्टर क्षेत्रात पसरले होते. येथे आढळलेल्या इमारतींचे बांधकाम आणि इंजीनियरिंगचा स्तर खूप प्रगत होता. हा शोध त्या गोष्टीचा पुरावा आहे की त्या काळातील लोक बहुमजली इमारती बांधण्यास सक्षम होते, जे प्राचीन शहरांच्या नियोजनाची प्रगत संकल्पना दर्शवते
या वस्तीमध्ये उत्खननादरम्यान अनेक प्रकारच्या कलाकृती सापडल्या आहेत, ज्यात मातीची भांडी आणि धातूची शस्त्रे आहेत. येथे राहणारे लोक खूप विकसित होते याचा पुरावा या कलाकृती देत आहेत
तथापि, त्यांची सामाजिक रचना अगदी सोपी होती, ज्यामध्ये सर्व लोकांना जवळजवळ समान अधिकार होते. कलाकृतींवर केलेल्या संशोधनानुसार त्या अतिशय सुंदर असण्यासोबतच त्या अगदी साध्याही आहेत. यावरून इथल्या लोकांचं राहणीमान साधं होतं, पण कला आणि सौंदर्याचीही त्यांना जाण होती, हे समजते