Saudi Arabia hanged 8 people in single day
Saudi Arabia news marathi : रियाध : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियाने(Saudia Arabia) एकाच दिवसात आठ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. सौदीच्या राज्य वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने ड्रग्ज तस्करीशी संबंधित प्रकरणामध्ये सात जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. शिवाय शिक्षा देण्यात आलेले व्यक्ती सोमाली आणि इथियोपियाचे आहेत. तसेच एका व्यक्तीला आईच्या हत्येसाठी शिक्षा देण्यात आहे.
सौदीच्या राज्य वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, देशाच्या नजरानच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये चरस तस्करीच्या केल्याबद्दल चार सोमाली आणि तीन इथिओपियन नागरिकांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. सर्वांना ड्रग्ज प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. एएफपीच्या मते, २०२५ मध्ये आतापर्यंत सौदीमध्ये २३० जणांना फाशी देण्यात आली आहे. यातील १५४ प्रकरणे ड्रग्जशी संबंधित आहे. यामध्ये सहभागी लोकांना मृत्यूदंड देण्यात आला आहे.
पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पच्या पाठीत खुपसतोय खंजीर? बलुचिस्तानच्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षा २०२४ मध्ये ३३८ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सौदी अरेबियाने सुनावली होती. परंतु यावेळी २०२५ जुलैपर्यंतच आकडा २३० पर्यंत पोहोचला असल्याने हा आकडा २०२४ पेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये सौदी अरेबियाने ड्रग्ज विरोधी मोहीम सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत ही प्रकरणे आतापर्यंत समोर आली असून यातील सहभागी व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
२०२३ मध्ये सुरु झालेल्या या मोहिमेमुळे फाशीच्या शिक्षेची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ ते २०२२ पर्यंत ड्रग्ज प्रकरणांमध्ये फाशीवर बंदी होती. परंतु २०२२ मध्ये ही बंदी हटवण्यात आली आणि १९ लोकांना मृत्यूदंड सुनावण्यात आला. २०२३ मध्ये केवळ २ लोकांना ड्रग्ज प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा मिळाली होती, परंतु यानंतर ड्रग्ज विरोधी मोहिमेमुळे या प्रकरणामध्ये ११७ जणांना शिक्षा मिळाली. तर २०२५ मध्ये १५४ लोकांना फाशी देण्यात आली आहे.
मानवाधिकार संघटनांकडून टिका
पंरतु सौदीर अरेबियाच्या या निर्णयावर मानवाधिकार संघटनांकडून टीका केली जात आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, खुल्या आणि सहिष्णु समाजाची प्रतिमा यामुळे खराब होत आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन २०३० योजनेचा हा भाग आहे. मात्र याला सर्वत्र विरोध केला जात आहे.
‘मी माझी कबर खोदत आहे’ , इस्रायली बंधकाचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल; जगाला टाकले हादरवून