मजा घेत होते तितक्यात अवकाशात आकाशपाळण्याचे झाले दोन तुकडे; हवेतच उडाले पार्टस अन् लोकं... घटनेचा थरारक Video Viral
देशात अनेक ठिकाणी कोणत्या खास प्रसंगी सार्वजनिक मेळाव्याचे आयोजन केले जाते ज्यात खाण्या-पिण्याचे स्टॉल्स आणि काही साहसी मनोरंजक खेळ ठेवले जातात. लोकांना अशा मेळाव्यांना जायला फार आवडते. आपल्या कुटूंबासह अनेकजण अशा मेळाव्यांना भेट देऊन इथे चांगला वेळ घालवतात. तुम्ही लहानपणी अशा मेळाव्यांना नक्कीच भेट दिली असावी. इथली सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त खेळली जाणारी गोष्ट म्हणजे आकाशपाळना! यात एका मोठा पाळणा अवकाशात फिरवला जातो आणि यात काही सीट्स असतात ज्यावर बसून लोक हवेत झुलण्याचा आनंद घेऊ शकतात. हा आकाशपाळना फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्येही खेळला जातो. अशात सौदी अरेबियातील तैफ शहरात देखील जत्रेनिमित्त ३६० अंश झुलणारा आकाशपाळना ठेवण्यात आला होता पण याची मजा लुटणाना एक मोठा अपघात घडून आला ज्यात अनेक लोकांना गंभीर दुखापत झाली तर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील भीतीदायक दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात जत्रेतील काही दृश्ये दिसत असून यात काही लोक आकाशपाळण्यात बसून अवकाशात उडण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसतात पण आकाशपाळना जसा वर जाऊन खाली राउंड मारायला येत असतो तितक्यातच त्याचे दोन तुकडे होतात. आकाशपाळण्याचा जड भाग मोठ्या आवाजात खाली पडतो आणि त्यावर बसलेले लोक त्यांच्या जागांना सेफ्टी बेल्ट लावून बसलेले असूनही वेगाने खाली पडतात. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की खांब इतक्या वेगाने तुटला की दुसऱ्या बाजूला बसलेल्या लोकांनाही त्याच्या धक्क्यामुळे दुखापत झाली. आकाशपाळना पडण्यामुळे काही लोक दूर पडले आणि त्यांनाही दुखापत झाली. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, या अपघातात किमान २३ लोक जखमी झाले आहेत.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत असून हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नर प्राण्यांची अवस्थाही पुरुषांसारखी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा, ही एक ही समस्या सगळीकडे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “महिला पॉवर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.