'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका कच्चे!
बटाट्याचा वापर रोजच्या जेवणात केला जातो. मात्र कच्चा बटाटा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. बटाट्यामध्ये सोलानाइन नावाचे विष आढळून येते, ज्यामुळे पोटाच्या समस्या, उलट्या, अतिसार आणि डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
मशरूममध्ये अनेक विषारी घटक आढळून येतात. त्यामुळे नेहमी कच्चे मशरूम खाण्याऐवजी व्यवस्थित स्वच्छ करून गरम पाण्यात उकळवून घेतलेले मशरुम खावेत. कच्चे मशरूम खाल्यामुळे अन्नातुन पोटात विष जाऊ शकते.
चिकन किंवा मासे कच्चे खाल्यास आरोग्य बिघडू शकते. यामुळे उलट्या, पोटदुखी, जुलाब इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी शिजवलेले चिकन आणि मासे खावेत. शिजवल्यामुळे त्यातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
कच्च्या वांग्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कच्च्या वांग्यात अतिप्रमाणात सोलानाइन नावाचा घटक आढळून येतो. या भाजीच्या सेवनामुळे पोटाच्या समस्या, मळमळ आणि पोटदुखी होऊ शकते.
अंड्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया आढळून येते. कच्च्या अंड्याचे सेवन केल्यामुळे अन्नबाधा किंवा पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अंड नेहमी शिजवून खावे.