लहान मुलांना चुकूनही खायला देऊ नका 'हे' पदार्थ
लहान मुलांच्या नाश्त्यात नेहमीच क्रीम पाव, टोस्ट किंवा इतर साखरयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास दिले जाते. या पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेह किंवा लठ्ठपणा वाढू लागते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात मुलांना धान्यांऐवजी दलिया, पोहे, उपमा किंवा संपूर्ण गव्हाचा ब्रेड खाण्यास द्यावा.
दही खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. पण लहान मुलांना कधीच बंद डब्यातील दही खाण्यास देऊ नये. यामुळे मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.
लहान मुलांना फ्रेंच फ्राईज, समोसे, चिप्स आणि पकोडे इत्यादी पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पोटात दुखणे किंवा खोकला लागण्याची जास्त शक्यता असते.
प्रक्रिया केलेल्या माशांमध्ये किंवा चिकनमध्ये सोडियम, नायट्रेट्स आणि प्रिझर्वेटिव्ह्ज जास्त प्रमाणात आढळून येते. यामुळे शरीरात कर्करोग किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवर्ड पॉपकॉर्नचे अजिबात सेवन करू नये. यामुळे डिहायड्रेशन, किडनी प्रेशर आणि एलर्जीचा धोका वाढू लागतो. त्यामुळे तुम्ही तूप आणि रॉक सॉल्टमध्ये बनवलेले पॉपकॉर्न खाऊ शकता.