हिवाळ्यात 'या' फळांचे सेवन करायला अजिबात विसरू नका, वाढलेले आजारपण कमी होऊन त्वचा होईल चमकदार
बाजारात मोठ्या प्रमाणावर पेरू उपलब्ध झाले आहेत. पेरूमध्ये असलेले फायबर शरीराची पचनक्रिया सुधारते. यासोबतच पेरू खाल्ल्यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो सुद्धा येतो.
थंडीत आवळ्याचे सेवन आवर्जून करायला हवे. आवळा खाल्ल्यामुळे शरीर, त्वचा आणि केसांना खूप जास्त फायदे होतात. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांची चमक वाढते.
थंडीत कोरडी आणि निस्तेज झालेली त्वचा पुन्हा नव्याने सुंदर करण्यासाठी नियमित संत्री खावी. संत्र्यात असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक शरीराला तात्काळ ऊर्जा देतात.
रक्तप्रवाह सुधारण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. डाळिंबाच्या सेवनामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक डाळिंब खावे.
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सफरचंद खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खावे.