Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi Vivah 2026: भगवान विष्णूंनी तुळशीला का दिलं वरदान? जाणून घ्या तुळशी विवाहाची कथा

Tulsi Vivah 2026: हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरूपाशी लावला जातो. मात्र, तुळशी विवाहामागे वृंदा आणि जालंधर यांची एक रंजक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊया या परंपरेमागील कथा आणि धार्मिक महत्त्व.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 21, 2026 | 11:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते.
  • कार्तिक शुक्ल द्वादशीला अनेक ठिकाणी तुळशी विवाह साजरा केला जातो.
  • तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरूपाशी किंवा श्रीकृष्णाशी लावला जातो.
 

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तुळशीला केवळ एक वनस्पती म्हणून नाही तर देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. कार्तिक पक्षातील शुक्ल पक्षातील द्वादशीला अनेक ठिकाणी तुळशी विवाह साजरा केला जातो.

काही ठिकाणी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालीग्राम स्वरुपाशी किंवा श्रीकृष्णाशी लावला जातो. या विवाहामागे सुद्धा एक अतिशय रंजक आणि भक्तिभावाने भरलेली अशी पौराणिक कथा आहे.

काय आहे पौराणिक कथा

या पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाची एक अत्यंत पतीव्रता आणि विष्णू भक्ती स्त्री होती. तिचा विवाह जालंधर नावाच्या पराक्रमी असुराशी झाला होता. वृंदा ही अत्यंत धार्मिक आणि पतीवरती निष्ठा ठेवणारी स्त्री होती. तिच्या पतीव्रता धर्माच्या सामर्थ्यामुळे जालंधराला सुद्धा मोठं संरक्षण मिळालं होतं. त्यामुळे देवतांना ही त्याचा पराभव करण कठीण झालं होतं. जालंधरच्या वाढत्या अत्याचारामुळे सर्व देवता चिंतेत पडले त्याचा पराभव करण्यासाठी सर्व देवतांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली.

Tulsi Vivah 2026: घरच्या घरी तुळशी विवाह करताना कोणते विधी करावेत? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धत आणि महत्त्व

भगवान विष्णूंनी घेतले जालधंरचे रुप

जालंधरचे सामर्थ्य वृंदाच्या पतीव्रता धर्मामुळे टिकून असल्याचं भगवान विष्णूंना सुद्धा माहीत होतं. भगवान विष्णूंनी जालंधराच रुप धारण करून वृंदाच्या समोर प्रवेश केला. आपल्या पतीचं रुप पाहून वृंदेचा पतीव्रता धर्म भंग झाला आणि त्यावेळी युद्धात जालंधरचा वध झाला. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर वृंदा दुखी झाली तिने भगवान विष्णूंना शाप दिला, तुम्हालाही पत्नीपासून वियोग सहन करावा लागेल. या शापाचा संबंध पुढे प्रभू श्रीरामांच्या अवतारातील सीतेशी देखील जोडला जातो.

वृंदेला तुळशी होण्याचा आशीर्वाद

यानंतर वृंदेने आपले प्राण त्यागले तिच्या भक्तीने आणि पतीव्रता धर्माने प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला. तू तुळशीच्या रुपात पृथ्वीवरती पुजली जाशील आणि माझ्या पूजेमध्ये तुझ्या पानांशिवाय नैवेद्य किंवा पूजा पूर्ण झाली असं मानलं जाणार नाही. असं मानलं जातं, वृंदेच्या स्मरणार्थ भगवान विष्णूंनीसुद्धा शालीग्राम स्वरुप धारण केलं आणि कार्तिक महिन्यात त्यांचा तुळशीची विवाह लावण्याची परंपरा सुरू झाली.

Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय

तुळशी विवाह कसा साजरा केला जातो?

तुळशी विवाह हा धार्मिक विधी नसून त्यातून निसर्ग आणि श्रद्धा यांच्यातील नातंसुद्धा अधोरेखित होतं. या दिवशी तुळशीच्या रोपाला सुंदर सजवलं जातं. तुळशीवृंदानाला रांगोळी, फुलांच्या माळा आणि दिव्यांनी सजवलं जातं. तुळशीला एका वधूप्रमाणे सजवून भगवान विष्णूंच्या शालीग्राम स्वरूपाशी तिचा विवाह लावला जातो. मंगलआष्टिका म्हटली जातात आणि विवाहाचा हा सोहळा पार पडतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुळशी विवाह कधी साजरा केला जातो?

    Ans: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला अनेक ठिकाणी तुळशी विवाह साजरा केला जातो.

  • Que: तुळशी विवाहामागील पौराणिक कथा काय आहे

    Ans: पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या विष्णुभक्त स्त्रीच्या भक्ती आणि पतिव्रता धर्माशी तुळशी विवाहाची कथा जोडलेली आहे.

  • Que: तुळशीचा विवाह कोणाशी लावला जातो?

    Ans: तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरूपाशी किंवा श्रीकृष्णाशी लावला जातो.

Web Title: Tulsi vivah mythological story vrinda jalandhar significance pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Vishnu
  • Tulsi Vivah

संबंधित बातम्या

Chafal Hanuman Temple: भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम! चाफळच्या दास मारुती आणि प्रताप मारुती मंदिरांचा इतिहास
1

Chafal Hanuman Temple: भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम! चाफळच्या दास मारुती आणि प्रताप मारुती मंदिरांचा इतिहास

Tulsi Vivah 2026: घरच्या घरी तुळशी विवाह करताना कोणते विधी करावेत? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Tulsi Vivah 2026: घरच्या घरी तुळशी विवाह करताना कोणते विधी करावेत? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धत आणि महत्त्व

Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेला का साजरी करतात देवदिवाळी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि पौराणिक महत्त्व
3

Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेला का साजरी करतात देवदिवाळी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि पौराणिक महत्त्व

Sant Namdev Maharaj Jayanti: महाराष्ट्राचे संत नामदेव पंजाबमध्ये ‘बाबा नामदेव’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या इतिहास
4

Sant Namdev Maharaj Jayanti: महाराष्ट्राचे संत नामदेव पंजाबमध्ये ‘बाबा नामदेव’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.