रात्री झोपण्याआधी नियमित प्या एक ग्लास दूध! हाडांना मिळेल भरपूर कॅल्शियम, कायमच राहाल सुदृढ
दुधामध्ये असलेले कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, गुडघे दुखी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एक ग्लास दूध प्यावे.
दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन नावाचे अमीनो ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे झोपेचे संप्रेरक सक्रिय होतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी नियमित एक ग्लास दूध प्यावे. दूध प्यायल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
हाडांमधील कॅल्शियम वाढवण्यासाठी एक ग्लास दूध प्यावे. ऑस्टियोपोरोसिस सारख्या गंभीर आजारापासून सुटका मिळवण्यासाठी दूध अतिशय प्रभावी ठरेल.
त्वचेच्या खराब झालेल्या पेशी सुधारण्यासाठी दूध प्यावे. यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. याशिवाय तुम्ही दुधात केशर मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.
दूध प्यायल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीर मजबूत ठेवतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.