सकाळी उठल्यानंतर नियमित करा पालक बीटच्या रसाचे सेवन, शरीरसंबंधित गंभीर समस्या कायमच्या होतील दूर
बऱ्याचदा रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर बाहेरून रक्त चढवले जाते. यामुळे काहीवेळा इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास बीटच्या रसाचे किंवा डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर नियमित बीटचा रस प्यायल्यास महिनाभरात रक्त वाढेल आणि त्वचेवर चमकदार ग्लो येईल. बीट पालकचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या उपलब्ध असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पालक भाजी बनवून खावी.
बीट पालकच्या रसाचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील सर्वच रक्तवाहिन्या स्वच्छ होतात.
फायबर युक्त पेयांचे रोजच्या आहारात नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत राहील आणि अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल.