हिवाळ्यात अनेकांना त्वचा फाटण्याचा त्रास होतो. विशेषतः कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींना तर हिवाळा नकोसा वाटतो. अशावेळी कशा पद्धतीने कोरड्या त्वचेची काळजी घ्यावी आपण जाणून घेऊया
थंडीच्या काळात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी, आंघोळ करताना कोमट पाणी वापरा. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि ती कोरडी आणि खडबडीत दिसते
आंघोळीनंतर ओल्या त्वचेवर नारळाचे तेल लावा. ते ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचा जास्त काळ मऊ आणि लवचिक ठेवते. नारळाचे तेल हिवाळ्यातील सर्वात प्रभावी आणि सुरक्षित त्वचेच्या उपचारांपैकी एक आहे.
जर तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव असेल तर दही किंवा दूध लावा. दुधातील नैसर्गिक लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करते आणि ओलावा टिकवून ठेवते. दही तेज आणि मऊपणा वाढविण्यासदेखील मदत करते
जर तुमच्या घरी ताजे गाय किंवा म्हशीचे दूध उपलब्ध असेल तर त्याचे क्रीम तुमच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर लावा. क्रीमने हलका मालिश केल्याने कोरडेपणा दूर होतो आणि नैसर्गिक चमक येते. आजीच्या बटव्यातील हा सर्वात आवडता घरगुती उपाय आहे आणि हिवाळ्यात तो अत्यंत फायदेशीर मानला जातो
जर तुमचे ओठ फाटलेले किंवा कोरडे असतील तर त्यांना तूप लावणे अत्यंत फायदेशीर आहे. डोळ्यांभोवती थोडेसे तूप लावल्याने त्वचा उजळते, सौंदर्य वाढते आणि काळी वर्तुळे कमी होतात