थंडीच्या दिवसांमध्ये आहारात करा शिंगाड्याचा समावेश, सुपरपॉवर देणारा पदार्थ नियमित खाल्ल्यास वाढेल शरीराची ताकद
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात करा शिंगाड्याचा समावेश, सुपरपॉवर देणारा पदार्थ नियमित खाल्ल्यास वाढेल शरीराची ताकद
शिंगाड्याचे पीठ आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. कमीत कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते.
शिंगाड्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण खूप जास्त असते. दातांमध्ये वाढलेल्या वेदना आणि हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी शिंगाडा खावा. यामुळे दात आणि हाडे मजबूत राहतात.
शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी शिंगाडा खावा. यामुळे संपूर्ण शरीराला भरमसाट फायदे होतात.