40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा
त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात विविध रंगांच्या भाज्यांचा समावेश करा. यात गडद हिरव्या, लाल आणि नारिंगी भाज्या, बीन्स आणि वाटाणे, स्टार्चयुक्त आणि स्टार्च नसलेल्या भाज्यांचा समावेश होतो.
तुम्ही आपल्या आहारात अधिकाधिक फळांचा समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सी समृद्ध फळे वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. यात संत्री, लिंबू, आंबा, पेरु, पपई, किवी अशा फळांचा समावेश होतो.
साखर आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही, आपल्या आहारतून गोड पदार्थांचे सेवन कमी करा. याऐवजी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा.
चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. जसे की, दूध, दही, चीज. तुम्ही फोर्टिफाइड सोया प्रोडक्टस खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळेल.
निरोगी प्रथिनांच्या स्रोतांमध्ये चिकन, सीफूड, अंडी, बीन्स, वाटाणे, नट, बिया आणि सोया यासारखे कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश होतो.