जेवणानंतर नियमित चावून खा 'हा' हिरवा पदार्थ
जेवल्यानंतर पचनाची समस्या उद्भवणे हे अतिशय सामान्य झाले आहेत. वारंवार पोटात दुखणे, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर वेलची किंवा वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे अन्न लवकर आणि पूर्णपणे पचन होण्यास मदत होते.
तोंडात वाढलेल्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा लाजिरवण्यासारखे वाटू लागते. तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी कोणत्याही माऊथ फ्रेशनरचा वापर न करता वेलचीचे सेवन करावे. यामुळे हिरड्या देखील स्वच्छ होतात.
मानसिक तणावांमुळे काहींना लवकर झोप येत नाही. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. वेलची खाल्यास झोपेची समस्या दूर होईल आणि शांत झोप लागेल.
उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात वेलचीचे सेवन करावे. वेलचीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरावर वाढलेले फॅट कमी होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.