डघ्यांमधून सतत करकर आवाज येतो? मग 'हे' उपाय करून मिळवा कायमचा आराम
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. कमी वयातच अनेकांचे गुडघे, कंबर किंवा हाडांमधील वेदना वाढू लागल्या आहेत. शरीराला पोषण आहार आणि आवश्यक विटामिन न मिळाल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. गुडघे दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर खाली बसताना आणि वरती उठताना खूप तीव्र वेदना होतात. याशिवाय शरीरात वाढलेल्या हानिकारक कोलेस्टरॉलमुळे गुडघे दुखीची समस्या जाणवते. हाडांमधील कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी आणि इतर आवश्यक विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर गुडघे दुखतात. याशिवाय सांध्यांचा त्रास, लठ्ठपणा, सतत उभे राहून काम किंवा चुकीच्या उभे राहिल्यामुळे सुद्धा गुडघ्यांमध्ये वेदना होतात.(फोटो सौजन्य – istock)
नसांमध्ये वाढू लागेल रक्त आणि हिमोग्लोबिन, रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल Iron ची कमतरता
अनेक वेगवेगळ्या लहान मोठ्या आजारांमुळे गुडघे दुखीची समस्या उद्भवते. चुकीचा व्यायाम, अपघातातील वेदना, पचनाची समस्या किंवा सांध्यांमध्ये सूज, संधिवात इत्यादी आजारांमुळे गुडघे दुखीचा त्रास होतो. बऱ्याचदा गुडघ्यांमधून करकर आवाज येतो. शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यानंतर गुडघ्यांमध्ये वेदना होतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर गुडघे दुखतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुडघे दुखीची समस्या कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे गुडघ्यांमधील वेदना कमी होतील आणि आरोग्य सुधारेल.
गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. दूध, दही, तूप, हळद, हिरव्या पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक विटामिन मिळतात. हाडांमधील वेदना कमी करण्यासाठी कॅल्शियम आणि विटामिन डी युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. याशिवाय हलका व्यायाम, योगासने, नियमित चालणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य सुधारते. गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याच्या पिशिवीने शेक घ्यावा. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. हळदीचे दूध, लसूण किंवा आल्याच्या सेवनामुळे गुडघ्यांना आलेली सूज कमी होते आणि चालताना किंवा उठताना वेदना होत नाहीत.
मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘हे’ गंभीर आजार, वेळीच व्हा सावध
सकाळी उठल्यानंतर गुडघ्यांना तिळाच्या तेलाने मालिश करावी. याशिवाय खोबऱ्याचे तेल हलकेसे गरम करून सुद्धा तुम्ही मालिश करू शकता. यामुळे वेदना कमी होतील. हलक्या हाताने मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि गुडघ्यांवर निर्माण झालेला अतिरिक्त तणाव कमी होतो. शरीराचे वाढलेले वजन गुडघे दुखण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करावा. याशिवाय कोणतेही घरगुती उपाय करून आराम मिळाला नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
गुडघेदुखीची कारणे:
अस्थिबंधन तुटणे, कूर्चा फाटणे, किंवा अचानक झालेल्या झटक्यामुळे गुडघ्याला दुखापत होऊ शकते. सतत एकच क्रिया केल्याने किंवा खेळ खेळल्यामुळे गुडघ्यांच्या सांध्याला त्रास होऊन वेदना होऊ शकतात.
गुडघे दुखीची लक्षणे:
गुडघ्यात वेदना, सूज, सांध्यांमध्ये ताठरपणा, हालचाल करताना त्रास होणे.