सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सफरचंद खावे. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते आणि शरीर स्वच्छ करते.
सकाळच्या नाश्त्यात सफरचंद खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. याशिवाय व्यायाम केल्यानंतर भूक लागल्यास सफरचंदाचे सेवन करावे.
रात्री सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि गॅस, आम्लपित्त होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळी सफरचंद खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर पेक्टिन असते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. पचनक्रियेला आराम देण्यासाठी आणि आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी नियमित एक सफरचंद खावे.
सफरचंदांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करून हार्ट अटॅकपासून शरीराचा बचाव करतात. याशिवाय यामधील फायबर ग्लुकोज हळूहळू शोषून घेते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.