Hazelnuts खाल्यामुळे डोक्यापासून ते अगदी पायांपर्यंत संपूर्ण शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
हेझलनट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात, ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी हेझलनट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.याशिवाय हृदयरोगाचा धोका कमी होतो.
हेझलनट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळून येते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करतात.
हेझलनट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या कमी करण्यासाठी हेझलनट्स खावे.
हेझलनट्समध्ये असलेले व्हिटॅमिन सी, ई आणि झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला संसर्गापासून वाचवतात.
हेझलनट्समध्ये व्हिटॅमिन ई आणि फिनोलिक संयुगे असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करून पेशींना नुकसान होण्यापासून रोखतात. यामुळे कर्करोग आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.