मधुमेह झाल्यानंतर या पदार्थांचे करा सेवन
अंबाडीच्या बियांचे पाण्यात भिजवून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. या बियांमध्ये असलेले घटक मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. तसेच अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येतात.
मधुमेह झाल्यानंतर आवळ्याचा रस प्यावा. आवळ्याच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
दालचिनी हा मसाल्यातील प्रकार मधुमेहावर अतिशय प्रभावी आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
मागील अनेक वर्षांपासून कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जात आहे. कडुलिंबाची पाने सकाळी उठून रिकाम्या पोटी चावून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहील. शिवाय इतर आजार होणार नाहीत.
चवीला कडू असलेली कारली कोणालाच आवडत नाही. पण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कारल्याच्या भाजीचा किंवा रसाचा समावेश करावा. ही भाजी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.